Home अहमदनगर रस्त्यात अडवून पिस्तुलाचा धाक दाखवून कर्मचाऱ्याला दांड्याने जबर मारहाण

रस्त्यात अडवून पिस्तुलाचा धाक दाखवून कर्मचाऱ्याला दांड्याने जबर मारहाण

Crime News employee was severely beaten with a stick at gunpoint

पाथर्डी | Crime News: ट्रक्टर शोरूममधील कर्मचाऱ्याला पाच जणांनी रस्त्यात अडवून पिस्तुलाचा धाक दाखवून लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील पिंपळगव्हाण फाटा परिसरात १८ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मच्छिंद्र उमाजी सुडके वय ५२ रा. शिरसाठवाडी त. पाथर्डी यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने अनोळखीपाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुडके यांना १८ ऑक्टोबर रोजी पाखरे नावाच्या व्यक्तीने फोन करून जुने ट्रक्टर पाहण्यासाठी पिंपळगव्हाण येथे बोलाविले. सुडके तिकडे जात असताना पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या पाच जणांनी त्यांच्या डोक्याला पिस्तुल लावून लाकडी दांड्याने मारहाण केली. यावेळी सुडके यांनी आरडाओरडा केली तेव्हा परिसरातील शेतात काम करणारे शेतकरी तेथे आले तेव्हा मारहाण करणारे आरोपी पळून गेले. या घटनेनंतर सुडके यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले.

Web Title: Crime News employee was severely beaten with a stick at gunpoint

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here