Home महाराष्ट्र दुचाकीवरून गोल्डमॅनवर गोळीबार, रक्तबंबाळ होऊन मृत्यू

दुचाकीवरून गोल्डमॅनवर गोळीबार, रक्तबंबाळ होऊन मृत्यू

Lonikund Firing at Goldman from a bike

डोक्यात गोळी लागून शिंदे रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला, मारेकरी दुचाकीने फरार

लोणीकुंद: लोणीकुंद ग्रामपंचायत समोर रस्त्यावर एटीएम समोर मारेकरी यांच्या हल्ल्यात सचिन नानासाहेब शिंदे वय २९ रा. लोणीकुंद ता. हवेली हा जागीच ठार झाला. ही घटना आज सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली.

सचिन शिंदे ग्रामपंचायत कार्यालयातून काम करून बाहेर आल्यावर एटीएम समोर सहकाऱ्यांशी गप्पा मारत असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या अज्ञातानी गोळीबार केला. यामध्ये शिंदे यांच्या डोक्यात गोळी लागून शिंदे रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. यानंतर मारेकरी दुचाकीने पसार झाले. त्यास जखमी अवस्थेत रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने लोणीकंद येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

शिंदे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला गोल्डमॅन म्हणून ओळखले जात होते.

याप्रकरणी लोणीकंद पोलीस निरीक्षक प्रताप मानकर अधिक तपास करीत आहे. अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही.

Web Title: Lonikund Firing at Goldman from a bike

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here