Home महाराष्ट्र Rajeev Kapoor: अभिनेते व दिग्दर्शक राजीव कपूर यांचे निधन

Rajeev Kapoor: अभिनेते व दिग्दर्शक राजीव कपूर यांचे निधन

Rajeev Kapoor

Rajeev Kapoor: राज कपूर यांचा मुलगा तसेच बॉलीवूड अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. त्यांचे वय ५८ वर्ष होते. रणधीर कपूर व ऋषी कपूर यांचे सर्वात धाकटे बंधू होते.

राजीव कपूर यांना हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांना चेंबूरच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कपूर घराण्यातील ऋषी कपूर यांच्या निधनाने कपूर कुटुंब सावरत असतानाच राजीव यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

राज कपूर यांचे सर्वात लहान चिरंजीव राजीव हे होते. त्यांनी फारसे चित्रपट केले नाही. पण त्यांच्या राम तेरी गंगा मैली आजही सिनेप्रेमींच्या मनात आहे. यामध्ये त्यांनी मुख्य भूमिका केली होती. जिम्मेदार चित्रपट हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता. त्यांनी भावासोबत मिळून हीना या चित्रपटाची निर्मिती केली होती. तसेच सुपरहिट प्रेमग्रंथ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात त्यांचा भाऊ ऋषी कपूर यांनी मुख्य भूमिका केली होती.

Web Title: Actor and director Rajeev Kapoor passes away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here