Home अहमदनगर सरपंच निवडीच्या वादातून एकावर हल्ला

सरपंच निवडीच्या वादातून एकावर हल्ला

Parner Attack on one of the Sarpanch election disputes

पारनेर | Parner: पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथे मंगळवारी सकाळी सरपंच निवडीच्या वादातून दोघानी एकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. नगरच्या शासकीय रूग्णालयात जखमीस दाखल करण्यात आले आहे.

सरपंच निवडीच्या वादातून दोघांनी शशिकांत अडसूळ या युवकावर शस्राने हल्ला करण्यात आला.  या हल्ल्यात शशिकांत अडसूळ असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात अडसूळ याच्या मानेला गंभीर जखमी झाले आहे. त्यांना नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अडसूळ याच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेस पोलिसांनी दुजोरा दिला असून तेथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Parner Attack on one of the Sarpanch election disputes

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here