Home अहमदनगर सरकारी वकिलाचा बंगला फोडला: ५० तोळ्यांचे दागिने लंपास

सरकारी वकिलाचा बंगला फोडला: ५० तोळ्यांचे दागिने लंपास

Ahmednagar public prosecutor's bungalow was broken into

अहमदनगर | Ahmednagar: रविवारी भरदिवसा चोरट्यांनी सरकारी वकिलाचा बंगला फोडून चोरी करण्यात आली. शहरातील कायनेटिक चौकातील रविश कॉलनी येथे दुपारो ३.३०  वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

यामध्ये तब्बल ५० तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात वकील गोरक्षनाथ काशिनाथ मुसळे यांनी फिर्याद दिली असून यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुसळे हे रविवारी दुपारी कुटुंबांसमवेत श्रीगोंदा येथे गेले होते. त्यानंतर घरकाम करणाऱ्या महिलेने काम आटोपून ती ३:३० वाजता घर बंद करून निघून गेली. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत घरातील बेडरूममधील असलेले ५० तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी चौरून नेले. सायंकाळी मुसळे हे ५.३० वाजता घरी आले असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. तेव्हा चोरी झाल्याचे समजले.

Web Title: Ahmednagar public prosecutor’s bungalow was broken into

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here