Home नांदेड प्रेमविवाहाला नकार दिल्यामुळे प्रेमीयुगुलाने विष प्राशन करुन आत्महत्या

प्रेमविवाहाला नकार दिल्यामुळे प्रेमीयुगुलाने विष प्राशन करुन आत्महत्या

Nanded News: कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिल्यामुळे प्रेमीयुगुलाने विष प्राशन करुन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Love couple committed suicide by consuming poison due to rejection of love marriage

नांदेड:  नांदेडमधून  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिल्यामुळे प्रेमीयुगुलाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती,  नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील दर्याबाई उमरी या गावात ही घटना घडली आहे. अंजली थोरात आणि आकाश वाठोरे अशी मृत तरुण आणि तरुणीचे नाव आहे. दोघांनी एकत्र विष प्राशन करुन आपली जीवन यात्रा संपवली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, “मृत अंजली थोरात आणि आकाश वाठोरे यांचे प्रेमसंबंध  होते. अंजली ही मूळची अर्धापूर तालुक्यातील पांगरी या गावाची रहिवासी होती. तिच्या आईचा मृत्यू झाल्याने ती आजोळी ऊमरी दर्या येथे मामाकडेच राहत होती. याच गावातील आकाश वाठोरे याच्यासोबत तिची मैत्री झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही शिक्षणासाठी हदगावला ये-जा करत होते.”

दोघांमध्ये तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. अंजलीच्या कुटुंबाला दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली. तिच्या वडिलांनी आणि आजोबांनी या संबंधाला नकार दिला. त्यानंतर अंजलीचे लग्न नात्यातील मुलासोबत लावून देण्यात आलं. लग्न झाल्यानंतरही आकाश आणि अंजलीमध्ये संवाद सुरु होता. 28 मार्च रोजी मुलगी नांदेडला आली होती. तेव्हा तिला आकाशने गाडीवर गावी आणले. पण ही माहिती आजोबांना समजली आणि त्यांनी दोघांवर राग काढला. पुढे देखील आपल्या संबंधाला मान्यता मिळणार नसल्याने दोघांनी 30 मार्च रोजी विषप्राशन केले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवाल उशिरा प्राप्त झाल्याने आज मनाठा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे

Web Title: Love couple committed suicide by consuming poison due to rejection of love marriage

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here