Home महाराष्ट्र Maharashtra Lockdown: राज्यात १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन, उद्या घोषणा होण्याची शक्यता

Maharashtra Lockdown: राज्यात १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन, उद्या घोषणा होण्याची शक्यता

maharashtra lockdown 15 days strict lockdown

Maharashtra Lockdown: कोरोनाला रोखण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत सर्वच सदस्यांनी लॉकडाऊनची मागणी केली. राज्यात सध्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याची सर्वांकडून व्यक्त करण्यात आले.

राज्यात लवकरच संपूर्ण लॉकडाऊन जाहीर होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. तसेच मंत्री अस्लम शेख यांनी संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत दिले आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून १५ दिवसासाठी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असून यासंदर्भात घोषणा बुधवारी होणार असल्याची माहिती मंत्रालयीन सूत्रांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळात आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे समजते. सर्वांकडून कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे व्यक्त करण्यात आली. मात्र बस ट्रेन बंद केल्या तर त्याचा परिणाम अत्यावश्यक सेवांवर होऊ शकतो. त्यावर काळजीपूर्वक अभ्यास करून निर्णय घेतला जाईल असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री स्वतः करतील असेही टोपे म्हणाले. उद्या या संदर्भात घोषणा होणार असल्याचे मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे.  

Web Title: Maharashtra lockdown 15 days strict lockdown

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here