Home महाराष्ट्र Maharashtra SSC Exams: दहावीची परीक्षा रद्द, मंत्रिमंडळात निर्णय

Maharashtra SSC Exams: दहावीची परीक्षा रद्द, मंत्रिमंडळात निर्णय

Maharashtra SSC Exams Cancel

Maharashtra SSC Exams: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याच्या हिताचे पाहता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्यसरकारने दिला आहे.

राज्यात आज कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. लॉकडाऊन, लसीकरण आणि परीक्षांबाबत चर्चा करण्यात आली, एसएस सी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. अंतर्गत मूल्यमापन यांचं आधारावर गुण देण्यात येणार आहे. श्रेणी सुधार हव्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी केव्हा व कशी द्यायची याबाबत निर्णय लवकरच कळविण्यात येणार असल्याचे सांगितले. बारवीच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाईल असेही माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Maharashtra SSC Exams Cancel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here