अहमदनगर: ऑक्सिजन संपल्याने रुग्णांना घेऊन जाण्याचे आवाहन, डॉक्टर हतबल, रुग्णांचे जीव धोक्यात
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपला आहे. त्यामुळे डॉक्टरांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. खासगी डॉक्टरांनी नातेवाईकांना ऑक्सिजन नसल्याने कोठेही घेऊन जाण्याच्या विनवण्या केल्या आहेत.
नगर शहरात ऑक्सिजन साठा बंद झाल्याने बाधितांची स्थिती भयानक झाली आहे. शहरात ऑक्सिजनची ५० टनाची गरज असताना केवळ २२ टनच मिळत आहे. जो कालपरवा मिळत होता तोही पुरवठा बंद झाल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे, डॉक्टर चिंतेत आहेत.
प्रशासनाने ऑक्सिजन समन्यायी वाटपासाठी समिती नियुक्त केली आहे मात्र ऑक्सिजनचा पुरवठाच नाही तर वाटप कशाचे करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे,
कोरोना महामारीने नागरिक होरपळून निघाले आहेत. जिल्ह्यात तीन मंत्री असताना सुविधा नसल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. बहुतांश आमदार कोविड सेंटरही सुरु करू न शकल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.
Web Title: Ahmednagar Appeal to take patients out of oxygen