Home Ahmednagar Live News अफगाणिस्तानातील मुस्लीम धर्मगुरूच्या हत्याकांडातील मुख्य आरोपीसह साथीदार राहुरीत जेरबंद

अफगाणिस्तानातील मुस्लीम धर्मगुरूच्या हत्याकांडातील मुख्य आरोपीसह साथीदार राहुरीत जेरबंद

Murder Case: दोन गावठी कट्ट्यासह पाच जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केले.

main accused in the murder of a Muslim cleric in Afghanistan, along with his accomplice

 

राहुरी: राहुरी पोलिसांनी एका हॉटेलवर झडप घालत अफगाणिस्तानातील मुस्लीम धर्मगुरूच्या हत्याकांडातील मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराला बुधवारी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन गावठी कट्ट्यासह पाच जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केले आहे.

संतोष हरिभाऊ ब्राह्मणे (वय 27 रा. समतानगर कोपरगाव), गोपाल लिंबा बोरगुले (वय 26 रा.चवडी जळगाव ता. मालेगाव), विशाल सदानंद पिंगळे (वय 23 रा. कोपरगाव) असे अटक केलेल्या  आरोपींची नावे आहेत.

बुधवारी कारवाई आटोपून जेवण करण्यासाठी राहुरी पोलीस घरी निघाले असता तोच पोलीस अधिकारी सज्जन नार्‍हेटा यांना नगर-मनमाड राज्य महामार्गालगत असलेल्या हॉटेल सर्जावर गावठी कट्यासह सराईत आरोपी जेवण करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नार्‍हेटा यांनी वरीष्ठ अधिकार्‍यांना घटनेची खबर दिली.

त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा या हॉटेलकडे वळवला. राञी 10 वाजण्याच्या सुमारास हॉटेल सर्जावर जेवण करण्यासाठी बसलेल्या आरोपींवर पोलिसांनी झडप मारली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी कट्टे आणि पाच जिवंत काडतुसे देखील आढळून आले. हा संपूर्ण थरारक प्रकार हॉटेलमध्ये असलेल्या ग्राहकांनी बघितल्यानंतर एकच दाणादाण उडाली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेटा हे करत आहेत.

Web Title: main accused in the murder of a Muslim cleric in Afghanistan, along with his accomplice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here