Home क्राईम धक्कादायक; पतीसमोरच मांत्रिकाने केला बलात्कार

धक्कादायक; पतीसमोरच मांत्रिकाने केला बलात्कार

शुद्धीकरणाच्या नावाखाली पतीसमोरच मांत्रिकाचा बलात्कार (Raped).

Mantrika raped her in front of her husband

मुंबई: शुद्धीकरणाच्या नावाखाली पतीसमोरच मांत्रिकाने बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता मासिक पाळीतील रक्ताचा जादूटोण्यासाठी केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी मांत्रिकासह पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

व्यवसायाने वकील असलेली ४५ वर्षीय तक्रारदार पालघर परिसरात राहण्यास आहे. २००१ ते मे २०२२ दरम्यान त्यांच्या पतीने वेळोवेळी मारहाण केली. तसेच भूत मागे लागल्याचे सांगत शुद्धीकरण करण्याच्या नावाखाली तांत्रिक बाबा संदीप जोशीकडे नेले. तेथे सुरुवातीला बाबाने जातिवाचक अपमानास्पद वक्तव्य केले. प्रसादामधून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून पतीसमोर वापर बलात्कार केला. तसेच बाबाच्या सांगण्यावरून चांदीच्या वाटीत मासिक पाळीचे रक्त तांत्रिक पूजेसाठी वापरल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्रासातून कायमची सुटका करण्यासाठी ४९ हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास मृत्यू होईल, अशी भीती घालून ४९ हजार रुपये उकळले, पोलिसांनी अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार सहबलात्कार व खंडणी, जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Mantrika raped her in front of her husband

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here