Home नांदेड ट्रक आणि ऑटोरिक्षाच्या  भीषण अपघातात पाच जण ठार

ट्रक आणि ऑटोरिक्षाच्या  भीषण अपघातात पाच जण ठार

ट्रक आणि ऑटोरिक्षाची जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात (Accident) पाच जण ठार, तर सात जण जखमी.

Five people were killed in a horrific accident involving a truck and an autorickshaw

नांदेड: ट्रक आणि ऑटोरिक्षाची जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार, तर सात जण जखमी झाले आहेत. नांदेड-मुदखेड रस्त्यावर मुगटजवळील पेट्रोल पंपासमोर गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. मृतांमध्ये तीन महिलांसह एका सात महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. जखमींवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुदखेड येथून १०-१२ प्रवासी गुरुवारी अॅपे ऑटोरिक्षाने नांदेडला जात होते. मुगट परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिली.

या अपघातात ऑटोरिक्षा पलटी झाला. ऑटोरिक्षातील काही जण ट्रकच्या चाकाखाली तर काही ऑटोमध्येच जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाले.

गालीअम्मा कल्याण भोई (२४), वेजल कल्याण भोई (७ महिने, दोघे रा. गेवराई, जि. बीड), पुंडलिक बळीराम कोल्हाटकर (७०, रा. सावरगाव माळ, ता. भोकर), ज्योती रमेश भोई (३२, रा. पवनसुतनगर डोणगाव, जि. बुलढाणा) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर विद्या संदेश हटकर (३७, रा. ईजळी, ता. मुदखेड) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींपैकी २ दोघांची प्रकृती गंभीर आहे.

Web Title: Five people were killed in a horrific accident involving a truck and an autorickshaw

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here