Home अहमदनगर ‘मित्रांनो अलविदा’ स्टेटस ठेवत शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

‘मित्रांनो अलविदा’ स्टेटस ठेवत शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagar News: ‘मित्रांनो अलविदा’ एका शिक्षकाने असे सोशल मीडियावर स्टेटस ठेवत टाकळीमानूर (ता. पाथर्डी) येथे दगडू शेख गळफास आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार.

teacher committed suicide by hanging himself while keeping the status Goodbye friends.jpeg

पाथर्डी: ‘मित्रांनो अलविदा’ एका शिक्षकाने असे सोशल मीडियावर स्टेटस ठेवत टाकळीमानूर (ता. पाथर्डी) येथे दगडू शेख गळफास आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी (दि. २९) रात्री अकराच्या सुमारास घडला. कर्जत येथील एका खासगी शैक्षणिक संस्थेत ते शिक्षक होते. याप्रकरणी पाथर्डी पोलिसात केली. अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दगडू गुलाब शेख (वय ४८, रा. टाकळीमानूर, ता. पाथर्डी) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. दगडू शेख हे कर्जत येथील एका खासगी शैक्षणिक संस्थेत शिक्षक होते. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दगडू गुलाब शेख यांनी बुधवारी रात्री अकराच्या सुमारास सोशल मीडिया साइटवर स्टेटस ठेवले होते. ‘मित्रांनो अलविदा, मित्रांनो माफ करा, मी जगाचा निरोप घेत आहे, अशा पद्धतीचे स्टेटस ठेवत त्यांनी टाकळीमानूर परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी आत्महत्या केली.

हा प्रकार समजल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मणराव पवार, पोलिस हवालदार ईश्वर गरजे यांनी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी चार वाजता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पाथर्डी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या शिक्षकाने गावाकडील ग्रामदैवत शहा शरीफबाबाच्या यात्रेतही सहभाग घेतला होता. त्यानंतर कर्जत येथे कार्यरत असणाऱ्या शैक्षणिक संस्थेत यात्रेत रुजू झाले होते. बुधवारी पुन्हा टाकळीमानूरला येऊन शिक्षकाने आत्महत्या केल्याचे समजते.

Web Title: teacher committed suicide by hanging himself while keeping the status ‘Goodbye friends’

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here