Home औरंगाबाद राजकीय आरक्षण हे तर आमच्या हक्काचे, जे आरक्षण ओबीसी प्रवर्गाला आहे, ते...

राजकीय आरक्षण हे तर आमच्या हक्काचे, जे आरक्षण ओबीसी प्रवर्गाला आहे, ते मिळावे- जरांगे पाटील

Maratha reservation: जरांगे विनाकारण ५० वर्षे मराठ्यांचे नुकसान, जे आरक्षण ओबीसी प्रवर्गाला आहे, ते मिळावे, मागणी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील.

Maratha Reservation Political reservation is our right Jarange Patil

छत्रपती संभाजीनगर: राजकीय आरक्षण आमच्या हक्काचे आहे. जे आरक्षण ओबीसी प्रवर्गाला आहे, ते मिळावे, अशी मागणी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी केली.

जरांगे म्हणाले, ओबीसी नेत्यांचा दबाव असल्याने मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही. सरकार पुरावे बघून आरक्षण देत आहे. विनाकारण ५० वर्षे मराठ्यांचे नुकसान झाले. सरकार म्हणते ओबीसीला धक्का लागू देणार नाही, ते बरोबर आहे.

आम्ही पूर्वीपासून ओबीसीमध्ये आहोत. ओबीसी नेत्यांनी नुकसान केल्याने आम्ही ५० वर्षे आरक्षणापासून वंचित आहोत. त्यामुळे आमचा अनुशेष भरून द्यावा. आम्हाला ओबीसीमध्ये घ्या, अन् मग १०० नाही, १५० टक्क्यांवर आरक्षण वाढवा. 

मराठा समाजाचे वाटोळे

आमच्या नेत्यांनी केले. त्यांनी समाजाला साथ दिली नाही. मराठा नेत्यांनी इतरांना आरक्षण दिले. मात्र, समाजाला दिले नाही. २४ तारखेपर्यंत आरक्षण मिळाले नाही, तर कोणी आरक्षण दिले नाही, त्यांची नावे जाहीर करणार. -मनोज जरांगे-पाटील

‘तोवर फटाके वाजविणार नाही’

मी दिवाळीनंतर पुन्हा दौरा सुरु १ करणार आहे. आरक्षण मिळेपर्यंत फटाके वाजविणार नाही. अनेक भावांच्या घरात अंधार झाला आहे. यामुळे दिवाळी साजरी करणार नाही.  माझ्या भावांनी बलिदान दिलं. मी २ कशी दिवाळी साजरी करू ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण घेऊन यावे, मग आम्हाला भेटावे, अशी इच्छा आहे. तसे झाले तर मग त्यांच्या गळ्यात पडू. परंतु, त्यांचा बुधवारचा दौरा रद्द झाल्याने, जरांगे व फडणवीस भेट होईल, या चर्चेला विराम मिळाला.

Web Title: Maratha Reservation Political reservation is our right Jarange Patil

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here