Home महाराष्ट्र मराठा आरक्षण देण्याची मागणी करत, पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या

मराठा आरक्षण देण्याची मागणी करत, पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या

Beed: एका तरुणाने मराठा आरक्षण देण्याची मागणी करत, पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना.

Marathas committed suicide by jumping from a water tank Reservation demand

बीड: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने मराठा आरक्षण देण्याची मागणी करत, पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

शत्रुघ्न काशीद असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मराठा आरक्षण देण्याची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी शत्रुघ्न शुक्रवारी रात्री पाण्याच्या टाकीवर चढला होता. तिथे काही काळ शत्रुघ्न याने आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली. तसेच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचीही इच्छा व्यक्त केली.

या घटनेची माहिती मिळताच हजर झालेल्या पोलिसांनी शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने रात्रीच्या सुमारास टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Marathas committed suicide by jumping from a water tank Reservation demand

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here