Home क्राईम राज्यात पुन्हा सापडला एमडी ड्रग्सचा कारखाना, ड्रग्सचे मोठे रॅकेट उधवस्त

राज्यात पुन्हा सापडला एमडी ड्रग्सचा कारखाना, ड्रग्सचे मोठे रॅकेट उधवस्त

Drug Racket: 10 कोटींचे ड्रग्स केले जप्त, आठ जणांना अटक, दोन जण फरार.

MD drugs factory found again in state, big drug racket busted

नाशिक: ससून रुग्णालयातून ललित पाटील याचे ड्रग्स प्रकरण उघड झाले होते. त्यानंतर एमडी ड्रग्स बनवणारे नाशिक आणि संभाजी नगरमधील कारखाने गेल्या काही दिवसांत पोलिसांना मिळाले. त्याठिकाणी एमडी ड्रग्सचा मोठा साठा मिळाला होता. यामुळे राज्यात चांगलीच चर्चा रंगली होती. आता सोलापूरमध्येही एमडी ड्रग्सचा कारखाना नाशिक पोलिसांना मिळाला. या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स मिळून आले. सोलापूरमध्ये एमडी ड्रग्सचा कारखाना सुरू असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सोलापूरच्या मोहोळ एमआयडीसीमधील कारखान्यावर नाशिक पोलिसांनी कारवाई केली. कोट्यावधी रुपयांचे एमडी ड्रग्स आणि कच्चामाल पोलिसांनी जप्त केला.

नाशिक पोलिसांच्या तीन पथकांनी सोलापूरमध्ये जाऊन कारवाई केली. कारखान्यात एमडी ड्रग्स आणि ड्रग्ससाठी लागणारा कच्चामाल पोलिसांनी जप्त केला. या ठिकाणी 10 कोटींचे ड्रग्स मिळाले आहे. तसेच आठ जणांना अटक करण्यात आली असून दोन जण फरार आहेत. यासंदर्भात बोलताना नाशिक शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी 12.5 ग्राम एमडी सापडले होते. त्या प्रकरणाचा तपास करत असताना काही आरोपींना अटक केली होती. सनी पगारे, अर्जुन पिवल, मनोज गांगुर्डे, सुमित पगारे यांना अटक झाली. त्यांच्याकडून पाच किलो एमडी ड्रग्ज मिळाले होते. ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: MD drugs factory found again in state, big drug racket busted

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here