Home अकोले अकोले: अल्पवयीन मुलीशी केला विवाह, गर्भपात करण्याचा प्रयत्न

अकोले: अल्पवयीन मुलीशी केला विवाह, गर्भपात करण्याचा प्रयत्न

Breaking News | Akole: विवाहानंतर काही दिवसांनी तिला शारीरिक, मानसिक त्रास देण्यास सुरुवात झाली. गर्भधारणा झाल्यानंतर तिच्या सासरकडील मंडळींनी तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न

Married a minor girl, attempted abortion

संगमनेर : मुलगा पत्रकार असल्याचे खोटे सांगून त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा विवाह अल्पवयीन मुलीशी लावून दिला. विवाहानंतर काही दिवसांनी तिला शारीरिक, मानसिक त्रास देण्यास सुरुवात झाली. गर्भधारणा झाल्यानंतर तिच्या सासरकडील मंडळींनी तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. ही घटना अकोलेतील एका गावात घडली.

संगमनेरातील लोकपंचायत संस्थेच्या पुढाकाराने या प्रकरणी मुलीच्या सासरकडील मंडळींविरोधात शुक्रवारी (दि. २६) राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

१२ मे २०२३ ला तिचा विवाह झाला. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण नसल्याने तिची आई विवाहाला नकार देत होती. परंतु मुलाच्या वडिलांनी आम्ही सोळा वर्षांच्या मुलीचे लग्न लावून दिले आहे, असे सांगितले. लग्नानंतर काही दिवसांनी तिला पतीचे विवाहबाह्य संबंध माहीत झाल्यानंतर तिने त्याच्याकडे त्याबाबत विचारणा केली असता तिची अधिक छळवणूक करण्यात आली. सासू, सासरा, दीर, आतेसासू या सर्वांनी क्षुल्लक कारणावरून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.

विवाहानंतर तीन महिन्यांनी संगमनेर येथे वकिलाच्या मार्फत तिच्या माहेर आणि सासरच्या लोकांमध्ये बैठक झाली. त्यानंतर येथून पुढे कोणतीही मारहाण, शारीरिक छळ करणार नसल्याचे स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यात आले, ५ सप्टेंबर २०२३ ला मुलगी पुन्हा सासरी नांदण्यास गेली.

मुलगी सासरी नांदण्यास गेल्यानंतर तिला शिवीगाळ व्हायला लागली. तिचा नवरा रात्री उशिरापर्यंत बाहेर राहून इतर मुलींबरोबर बोलतो. सासू, सासरा, दीर हे अश्लील भाषा वापरतात. दीर वाईट नजरेने पाहतो. मुलीला दिवस गेले हे समजल्यानंतर सासरकडील मंडळीनी प्रॉपर्टीला वारस नको म्हणून गोळ्या खाऊ घालून गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. तिने गोळ्या खाण्यास नकार दिल्याने तिला बेदम मारहाण केल्याने ती बेशुद्ध झाली.

मुलीच्या आई, भावालाही मारहाण मुलीच्या माहेरकडील मंडळींना शिवीगाळ करत मुलीला घेऊन जा असे सांगण्यात आले. तिला तिचे आई, भाऊ बघण्यासाठी आले असता मुलगी किचनमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडली होती. मुलीच्या सासरकडील मंडळींनी तिच्या आई आणि भावालादेखील मारहाण केली. अशा परिस्थितीत तिचे माहेरकडील लोक मुलीला राजूर पोलिस ठाण्यात घेऊन गेले. उपचारांची गरज असल्याने तिला पहिल्यांदा राजूर आणि त्यानंतर नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Married a minor girl, attempted abortion

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here