अहमदनगर: गावठी पिस्टलचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Breaking News | Ahmednagar: एका अल्पवयीन मुलीला गावठी पिस्टलचा धाक दाखवून गेल्या आठ वर्षापासून अत्याचार करत असल्याची घटना उघडकीस.
राहुरी: राहरी तालुक्यातील एका गावात दोघा नातेवाईकांनी मिळून एका अल्पवयीन मुलीला गावठी पिस्टलचा धाक दाखवून गेल्या आठ वर्षापासून अत्याचार करत असल्याची घटना उघडकीस आली. या घटनेबाबत राही पोलीस ठाण्यात अपहरण, अत्याचार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी तालूक्यातील एका गावात पीडित मुलीच्या घरी दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्टीत तीचे नातेवाईक ऋषिकेश पांडुरंग धोंडे (वय २५) व सतीश विठ्ठल टकले (दोघे रा. आष्टी जि. बीड), हे दोघे येत असत.
या दोघांनी सन २०१६ ते एप्रिल २०२४ या दरम्यान मुलीवर लैंगिक अत्याचार करत मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करून तिला वेळोवेळी ब्लॅकमेल केले. तसेच गावठी पिस्टलचा धाक दाखवून तिच्यावर वेळोवेळी विविध ठिकाणी अत्याचार केले. नंतर ऋषिकेश धोंडे याने मुलीचे अपहरण करून तिला पुणे येथील आळंदी येथे घेऊन जाऊन तिच्याशी बळजबरीने लग्न केले. त्यानंतर तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला फाशी देण्याचा तसेच विहिरीत ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
ऋषिकेश पांडुरंग धोंडे व सतीश विठ्ठल टकले दोघे रा. आष्टी जि. बीड, या दोघांवर भादंवि कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३७६ (ड), ३६६, ३५४, ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४, सह पोस्को अधिनियम कलम ८, ११, १२ प्रमाणे मारहाण, धमकी अपहरण, अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे करत आहेत.
तपासा दरम्यान आरोपीचा सुगावा लागल्याने पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, सहाय्यक फौजदार चंद्रकांत बहऱ्हाटे, या घटनेबाबत राहरी पोलिस ठाण्यात हवालदार आजिनाथ पालवे, सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, नदीम शेख, इफ्तेखार सय्यद, अंकुश भोसले, सतीश कुऱ्हाडे, गोवर्धन कदम, अशोक शिंदे आदी पोलिस पथकाने आरोपी ऋषिकेश धोंडे याला बीड जिल्ह्यातून शिताफीने ताब्यात घेऊन गजाआड केले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाकडून त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेतील दुसरा आरोपी सतीश टकले हा अद्याप पसार असून पोलीस पथक त्याचा शोध घेत आहेत.
Web Title: abused minor girl by showing fear of village pistol
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study