Home अकोला ‘रात्री भेट, पगाराचं काम करून देतो’; महसूल सहायकावर गुन्हा

‘रात्री भेट, पगाराचं काम करून देतो’; महसूल सहायकावर गुन्हा

Breaking News | Akola Crime : तहसील कार्यालय विभागातील संजय गांधी निराधार योजनेत कार्यरत महसूल सहाय्यक खुळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची गंभीर घटना उघडकीस.

Meet at night, get paid work done'; Crime against revenue assistant

अकोला: अकोल्याच्या तहसील कार्यालय विभागातील संजय गांधी निराधार योजनेत कार्यरत महसूल सहाय्यक खुळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. शहरातील एका विधवा महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, महसूल सहाय्यकाने कार्यालयीन कामाच्या निमित्ताने तिच्याशी संपर्क साधला आणि मोबाईलवरून वारंवार फोन करून कार्यालयात बोलावले.

याबाबत अधिक माहिती अशी की,  अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत तहसील कार्यालयात एका विधवा महिलेला पगार लावून देतो असे म्हणत तिने दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी दुपारी पीडित महिला तहसील कार्यालयात गेल्यानंतर महसूल सहाय्यक खुळे यांनी तिचा हात पकडला आणि रात्री भेटल्यास पगाराचे काम करून देतो, असे म्हणत तिच्यासोबत गैरवर्तन केले. याचवेळी कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर देखील “तू मला भेट” असे सांगून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप महिलेने पोलिसांकडे केला आहे.

महिलेच्या लिखित तक्रारीनंतर सिटी कोतवाली पोलिसांनी तत्काळ भारतीय दंड संहितेच्या संबंधित ७४ कलमान्वये महसूल सहाय्यकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Breaking News: Meet at night, get paid work done’; Crime against revenue assistant

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here