Home क्राईम ‘मेरे चारों तरफ बम लगा है’, विमानतळवर आजीबाईंची धमकी

‘मेरे चारों तरफ बम लगा है’, विमानतळवर आजीबाईंची धमकी

Pune Crime: महिलेने ‘मेरे चारों तरफ बम लगा है’ असे फ्रिस्किंग बूथमध्ये बसलेल्या सीआयएसएफच्या जवानांना सांगितले.

Mere chara taraf bam laga hai', grandmother's threat at the airport

पुणे : लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला जाण्यासाठी आलेल्या एका ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने ‘मेरे चारों तरफ बम लगा है’ असे फ्रिस्किंग बूथमध्ये बसलेल्या सीआयएसएफच्या जवानांना सांगितले. त्यामुळे विमानतळावर तपास यंत्रणांची एकच धावपळ उडाली. अखेर योग्य ती खबरदारी बाळगत सुरक्षितरीत्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नीता प्रकाश कृपलानी (७२, रा. गुडगाव औद्योगिक वसाहत) असे अटक महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सीएसआयएफ (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल) च्या महिला पोलिस शिपाई दीपाली बबनराव झावरे (33, रा. लोहगाव) यांनी तक्रार दिली.

२३ ऑगस्ट रोजी आरोपी महिला नीता कृपलानी या विमानतळावर फ्रिस्किंग बूथसमोर आल्या असता, तेथे उपस्थित सीआयएसएफच्या जवानांकडे बघत ‘मेरे चारों तरफ बम लगा है,’ असे म्हणाल्या. यामुळे विमानतळावर एकच गोंधळ उडाला. मात्र, तिची झडती घेतली असता ती अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: ‘Mere chara taraf bam laga hai’, grandmother’s threat at the airport

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here