Home अहमदनगर अहमदनगर: भेटायला आली नाहीस, तर फोटो व्हायरल, अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अहमदनगर: भेटायला आली नाहीस, तर फोटो व्हायरल, अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Ahmednagar News: १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे बळजबरीने मोबाईलमध्ये फोटो काढून, भेटायला आली नाहीस, तर फोटो व्हायरल करून तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली. (molestation)

you don't come to meet, the photo goes viral, molestation of a minor girl

राहुरी:  तालुक्यातील वांबोरी येथे अल्पवयीन मुलीचा मोबाईलमध्ये फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी राहुरी पोलिसांत शहानवाज शेख याच्याविरोधोत पोक्सो, विनयभंग तसेच अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेमुळे तणावाची स्थिती असून, आरोपीच्या घर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

उंबरे येथील घटना ताजी असतानाच, वांबोरी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी गुरुवारी (३ ऑगस्ट) मध्यरात्रीनंतर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी शहानवाज आसीफ शेख (रा. वांबोरी, ता. राहुरी) याच्यावर कलम ३५४, ३५४ (ड), ५०६ व पोस्को कायदा कलम ८,१२ तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (१) आर. ३ (१) (डब्लू) (१) प्रमाणे विनयभंग, पोस्को व ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, वांबोरी येथील भाजीपाला व फळे विक्रेता शहानवाज आसीफ शेख याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे बळजबरीने मोबाईलमध्ये फोटो काढून, भेटायला आली नाहीस, तर फोटो व्हायरल करून तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन परस्थितीचा आढावा घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनेचा अधिक तपास अप्पर पोलिस अधीक्षक बसवराज शिवपुंजे करीत आहेत.

Web Title: you don’t come to meet, the photo goes viral, molestation of a minor girl

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here