Home अहमदनगर अहमदनगर: महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अहमदनगर: महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Ahmednagar News: एका महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molested)केल्याची घटना.

A minor girl studying in college was molested

पाथर्डी: शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याबाबत पीडित मुलीच्या फिर्यादीवरून अजय पिराजी पवार (रा. शिक्षक कॉलनी, पाथर्डी) याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्साअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित पीडित मुलगी मैत्रिणीबरोबर कॉलेजच्या गेटसमोर बसलेली असताना, अजय पवार तेथे आला. त्याने तिच्याशी लगट करीत अश्लील वर्तन केले. अल्पवयीन मुलीच्या मित्रांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर तपास करीत आहेत.

Web Title: A minor girl studying in college was molested

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here