Home अहमदनगर अहमदनगर: घरात सापडल्या धक्कादायक गोष्टी, घरात पोलिसांचा छापा

अहमदनगर: घरात सापडल्या धक्कादायक गोष्टी, घरात पोलिसांचा छापा

Ahmednagar Crime News:  स्टेशन रस्त्यावरील एका घरातून कोतवाली पोलिसांनी धारदार शस्त्रे जप्त, घरात सापडल्या दोन तलवारी, गुप्ती; दोघांविरुध्द गुन्हा, कोतवाली पोलिसांची कारवाई.

Two swords found in the house, Gupti Crime against both

नगर :स्टेशन रस्त्यावरील मातोश्री कॉलनीमध्ये एका घरामध्ये छापा घालून कोतवाली पोलिसांनी तलवारी, गुप्ती अशी धारदार शस्त्रे जप्त केली. त्यात दोघांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले.

तुषार अर्जुन हरेल (वय २७), अर्जुन विष्णू हरेल (वय ६३) (दोघेही रा. मातोश्री कॉलनी, रेल्वेस्टेशन रोड नगर) असे आरोपींची नावे आहेत. अधिक माहिती अशी, २ नोव्हेंबर रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, रेल्वे स्टेशन रोडवरील मातोश्री कॉलनीमध्ये एका घरामध्ये अवैधरित्या शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी स्टेशन रस्त्यावरील मातोश्री कॉलनीमध्ये छापा घातला असता घरामध्ये बेडखाली दोन तलवारी व एक गुप्ती आढळून आली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस कर्मचारी तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, ए. पी. इनामदार, अमोल गाढे, संदिप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, राहुल गुंडू आदींच्या पथकाने केली आहे.

Web Title: Two swords found in the house, Gupti Crime against both

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here