Home संगमनेर संगमनेर: वस्तीगृहातून अल्पवयीन मुलीस पळविले

संगमनेर: वस्तीगृहातून अल्पवयीन मुलीस पळविले

Breaking News | Sangamner: अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याची घटना. ( abducted)

minor girl was abducted from the hostel

संगमनेर: अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याची घटना काल शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास तालुक्यातील आदिवासी मुलींच्या वसतीगृहात घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील एका गावात आदिवासी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह बांधण्यात आले आहे. या वस्तीगृहामध्ये अनेक आदिवासी मुले राहतात. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मुलींच्या वस्तीगृहामधून अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी या वस्तीगृहातील साडेसतरा वर्ष वय असणाऱ्या एका मुलीला फुस लावून पळवून नेले. याबाबत मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गु.र.नं. १७९/ २०२४ नुसार भा.दं. वि. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: minor girl was abducted from the hostel

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here