Home अहमदनगर अहमदनगर: हजारो मराठा बांधव निवडणूक अर्ज भरणार

अहमदनगर: हजारो मराठा बांधव निवडणूक अर्ज भरणार

Breaking News | Ahmednagar | Maratha Reservation: सकल मराठा समाजाच्या बैठकीत ठराव,  लोकसभा निवडणुकीत हजारो मराठा – बांधव उमेदवारी अर्ज दाखल करतील. (Loksabha Election).

Maratha Reservation Thousands of Maratha brothers will fill loksabha election applications

अहमनगर | बीड: लोकसभा निवडणुकीत हजारो मराठा – बांधव उमेदवारी अर्ज दाखल करतील, असा निर्णय नगरमध्येही घेण्यात आला आहे. मराठा समाज आरक्षण आंदोलनाला ज्यांनी पाठींबा दिला नाही, अशा उमेदवारांना कोणत्याही प्रकारची मदत न करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे. दरम्यान, बीड येथे झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधातही उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा बांधवांनी राज्यात नांदेड, बीड येथे घेतलेल्या बैठकांमध्ये लोकसभा निडवणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे लोण आता पसरत चालले आहे. सकल मराठा समाजाची शनिवारी (दि.२) नगरमध्ये तातडीची बैठक पार पडली. यामध्ये निवडणुकीसाठी हजारो अर्ज दाखल करण्याचा महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यावेळी अॅड. गजेंद्र दांगट म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत हजारो मराठा बांधव अर्ज दाखल करणार असून मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला ज्यांनी पाठींबा दिला नाही, अशा उमेदवरांना देखील कोणत्याही प्रकारची मदत न करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आला आहे.

संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण संदर्भात गेल्या अनेक महिन्यांपासून उपोषण करत आहेत. याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. तसेच जरांगे यांच्या बिरोधात एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातून सरकारने आता संघर्षयोध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासह आंदोलनात सहभागी असलेल्या सर्व समाज बांधवाची देखील एसआयटी चौकशी करावी, यांसदर्भात सरकारला इमेल करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी नगर शहर व तालुक्यातील अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी बीडमध्ये आयोजित बैठकीतही मराठा बांधवांनी लोकसभा निवडणुकीसाठी निर्णय घेतला. लोकसभेसाठी प्रत्येक गावातून २ अर्ज, ५००० उमेदवार देणार आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाहविरुद्धही फॉर्म भरले जाणार आहेत. दुसरीकडे फक्त मराठा समाजातीलच उमेदवार नाही तर इतर समाजातील देखील लोकांना या निवडणुकीत सरकारच्या विरोधात उभे करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार गंभीर नसून निवडणुकीमध्ये मराठा समाजचं सरकारला घेरणार आहे. तर या बैठकीमध्ये महत्त्वाचे ठराब घेण्यात आले असून जोपर्यंत सगळे सोयरे या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत मराठा समाज कोणत्याही नेत्याच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं एकमताने ठरवण्यात आल आहे.

Web Title: Maratha Reservation Thousands of Maratha brothers will fill loksabha election applications

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here