Home अहमदनगर शिर्डीची जागा ठाकरे गटच लढवणार, उमेदवार कोण?

शिर्डीची जागा ठाकरे गटच लढवणार, उमेदवार कोण?

Breaking News | Ahmednagar Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत शिर्डीची जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे. ही जागा आम्ही सातत्याने जिंकत आलो खा. राऊत यांचा दावा : भाजप नेत्यांवर खोटारडेपणाचा आरोप.

Loksabha Election Shirdi seat will be contested by the Thackeray group, who is the candidate

शिर्डी: लोकसभा निवडणुकीत शिर्डीची जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे. ही जागा आम्ही सातत्याने जिंकत आलो आहे. आमच्या पक्षाने इथे प्रचाराला देखील सुरूवात केली आहे. चर्चेत प्रत्येक पक्ष जागा मागत असतो, त्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह असतो. मात्र पुढे जायचं असतं, असे खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळे एकजात खोटारडे आहेत, अशी टीका खा. राऊत यांनी यावेळी केली.

खासदार संजय राऊत यांनी शिर्डीत शनिवारी साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खा. राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदींनी वर्षाला २ कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. या देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे रोजगार देणं ही केंद्र आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे. फडणवीस बेछुट बेफाम काहीही बोलतात. त्यांना महत्व देण्याची गरज नाही तर त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे.

मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळे एकजात खोटारडे आहेत अशी टीका खा. राऊत यांनी केली. बारामतीत शरद पवारांनी अनेक उद्योग आणून रोजगार दिला तिथे मेळावा होत आहे. तिथे तुम्ही राजकारणासाठी मेळावा घेत असाल, मात्र शरद पवारांचा तो इलाका ते धमाका करणारच, मुंबईत राहुल गांधी यांची न्याय यात्रा येत आहे. राहुल गांधी हे इंडिया आघाडीचे नेते आहेत. त्यांनी सुरू केलेल्या यात्रेचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्ही सगळे त्यांच्या यात्रेचे स्वागत करणार आहोत.

महाविकास आघाडी जागा वाटप आणि प्रकाश आंबेडकर यांच्या विषयी विचारले असता खा. राऊत म्हणाले, महाबिकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा संपली आहे. यावर आता कोणतीही बैठक होणार नाही, याचा अर्थ जागावाटपाचा निर्णय झालेला आहे. वंचितने जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्याबर प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर चर्चा करून निर्णय घेऊ. त्यांना महाविकास आघाडीत समाविष्ट केलं असून लवकरच शरद पवार राज ठाकरे आणि फडणवीस यांचे सुर जुळतात. मनसे भाजप एकत्र येणार का? यावर  ‘सुर मिलने के लिए अभी देर है’ असं फडणवीस यांनी एका कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं होतं त्याबर फडणवीस यांना तुम्ही गांभिर्यान का घेता? ऐकून सोडून द्यायचं असतं, हवा येऊ द्या असे म्हणत त्यांनी मिश्कील भाष्य केले.

मतभेद दूर होतात, मनभेद दूर होत नाही. त्यांनी विश्वासघात केला त्यामुळे ठाकरेंसोबत जाणार नाही अस फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावर राऊतांनी फडणविसांवर घणाघात केला. फडणवीस यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, कोणी विश्वासघात केला. फडणवीस आज जे बोलतात तोच विश्वासघात आहे. २०१४ साली कोणी युती तोडली, त्यानंतर मातोश्रीवर निमंत्रण घेऊन कोण आले. त्यानंतर झालेली चर्चा करण्यासाठी फडणवीस यांचा बरोबर अमित शाह आले होते ना असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

पवारांच्या आशिर्वादाने मुंडे विरोधात मुंडे संघर्ष बघितला आता बारामतीत पवार विरोधात पवार असा संघर्ष पहायला मिळतोय हे कालचक्र आहे अस फडणिवस म्हणाले होते. यावर संजय राऊतांनी फडणविसांवर घणाघाती टिका केली. फडणवीस काहीही बोलतील त्यांच्यावर जास्त विश्वास ठेऊ नका. हे सगळे मनोरुण झाले आहे. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे असे सांगून मोदी पासून फडणवीस पर्यंत सगळे एकजात खोटारडे आहे अशी टीका केली.

भाजपचे विवेक कोल्हे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात मोर्चा काढत पालकमंत्री कोपरगाव तालुक्यात निधी देताना दुजाभाव करतायत असा आरोप केला होता यावर विचारले असता खासदार राऊत म्हणाले, काल निधी वाटपावरून एका मंत्र्याने मार खाला आहे, अशी टीपणी त्यांनी केली. यावेळी साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन कोते, तालुकाध्यक्ष संजय शिंदे, सुहास वहाडणे, भरत मोरे, सुयोग सावकारे, माजी उपजिल्हा प्रमुख राजेंद्र पठारे उपस्थित होते.

उमेदवार कोण?

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी शिर्डी मतदारसंघात पक्षाने प्रचारही सुरू केल्याचा दावा केला असला तरी उमेदवार कोण? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना रिंगणात उतरवले जाणार, अशी चर्चा त्यांचे समर्थक करत आहेत. मात्र अद्याप चित्र स्पष्ट नाही. त्यातच खा. राऊत यांच्या दाव्याने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, अद्याप महायुतीच्या उमेदवारीचे चित्रही स्पष्ट झालेले नाही.

Web Title: Loksabha Election Shirdi seat will be contested by the Thackeray group, who is the candidate

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here