Home क्राईम Rape: चॉकलेटचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, तरुणाला अटक

Rape: चॉकलेटचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, तरुणाला अटक

Rape News:  १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाला मलबार हिल पोलिसांनी सोमवारी अटक केली.

Mumbai minor girl was Rape by luring her with chocolate.jpg

मुंबई : चॉकलेटचे आमीष दाखवून १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाला मलबार हिल पोलिसांनी सोमवारी अटक केली. अटक आरोपी मूळचा बिहार येथील रहिवासी आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलगी मलबार हिल परिसरातील रहिवासी आहे. आरोपी पीडित मुलीच्या घरासमोर येऊन तिला चॉकलेट देण्याचे आमीष दाखवत होता. शनिवारी आरोपी पीडित मुलीला चॉकलेट देण्याचे व मुंबई फिरवण्याचे आमीष दाखवून घेऊन गेला. त्यानंतर आरोपीने गिरगाव चौपाटी येथून हँगिग गार्डनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी असलेल्या झुडूपांमध्ये मुलीला नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मलबारहिल पोलिसांनी विनोदकुमार यादव (२१) या तरुणाला अटक केली आहे.

Web Title: minor girl was rape by luring her with chocolate

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here