Home अहमदनगर शेततळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ

शेततळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ

Ahmednagar, Jamkhed: साखर कारखान्याशेजारील एका शेततळ्यात एका ३५ ते ४० वर्षीय इसमाचा मृतदेह (Dead body)आढळल्याने परिसरात खळबळ.

Jamkhed dead body was found in the farm

जामखेड: जामखेड तालुक्यातील हळगाव येथील जय श्रीराम साखर कारखान्याशेजारील एका शेततळ्यात एका ३५ ते ४० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

श्रीराम शुगर कारखान्याच्या जवळील अप्पा दशरथ ढवळे यांच्या शेततळ्यातील पाण्यावर हा मृतदेह तरंगत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत माहिती पोलिस पाटील सुरेश ढवळे यांनी जामखेड पोलिसांना कळवली. पोलिसांनी रात्री सात वाजण्याच्या सुमारास मृतदेह बाहेर काढला. मृतदेह पूर्णत: सडलेल्या अवस्थेत होता.

सदर व्यक्ती हा उत्तर प्रदेश राज्यातील असल्याचे ओळखपत्रावरून स्पष्ट झाले असून त्याचे नाव जाफर हुसेन सय्यद असे असल्याचे समजले. मृतदेहाचे शवविच्छेदन घटनास्थळीच केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितला.

घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे, हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे, पोलीस नाईक अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल सतीश दळवी, चालक हनुमान आडसूळ, गुन्हा शोधपथकाचे संग्राम जाधव, अरुण पवार यांनी हा मृतदेह बाहेर काढला.

Web Title: Jamkhed dead body was found in the farm

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here