Home क्राईम धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, खून करुन मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवला

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, खून करुन मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवला

Jalgaon Crime: धक्कादायक घटना उघडकीस, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (sexually assaulted) करुन तिचा दगडाने खून , त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यातच चाऱ्यामध्ये लपवून ठेवला.  

minor girl was sexually assaulted, murdered and her body was hidden in cattle fodder

जळगाव: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा दगडाने खून  केल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीवरुन पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्यात गोंडगाव इथे घडली. या घटनेत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या गावकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केला.

गोंड गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा खून करुन तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवल्याची धक्कादायक घटना 1 ऑगस्ट रोजी समोर आली होती. या घटनेतील संशयिताला गुरुवारी (3 ऑगस्ट) पोलिसांनी अटक केली आहे. त्याला गुन्ह्याच्या घटनास्थळाची पडताळणी करण्यासाठी गावात घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय 19 वर्षे) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. मुलीवर लैगिंक अत्याचार केल्यानंतर मुलीशी झालेल्या झटापटीत तरुणाने मुलीच्या डोक्यात दगड घातला आणि त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यातच चाऱ्यामध्ये लपवून ठेवल्याची कबुली अटकेतील संशयिताने पोलिसांसमोर दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान मुलगी सापडत नसल्याने मुलीच्या पालकांनी ती बेपत्ता झाल्यासह अपहरणाची तक्रार पालकांनी पोलीस स्टेशनला केली होती. त्यानुसार भडगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयिताच्या अटकेसाठी कुटुंबियांसह नातेवाईकांनी भडगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन आंदोलन करत अत्यसंस्कार न करण्याचा पावित्रा घेतला होता.

दोन दिवसांपासून मृतदेह कडब्याच्या कुट्टीत असल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार 1 ऑगस्ट रोजी उघडकीस आला. ज्या कडब्याच्या कुट्टीत मृतदेह मिळाला तो गोठा स्वप्नील विनोद पाटील (वय 19, रा. गोंडगाव ता. भडगाव) याचा असल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी स्वप्निल याला अटक केली. 30 जुलै रोजी दुपारी सदर मुलीला आमिष दाखवून संशयिताने त्याच्या गोठ्यात तिला बोलावले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर प्रकरण उघड होऊ नये म्हणून तिच्या चेहऱ्यावर दगड मारुन तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह त्याने गोठ्यातील कडब्याच्या कुट्टीखाली लपवून ठेवला होता, अशी कबुली संशयिताने पोलिसांना दिली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: minor girl was sexually assaulted, murdered and her body was hidden in cattle fodder

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here