Home क्राईम १५ वर्षीय मुलीवर डान्स टीचरने केला लैंगिक अत्याचार, तू दिसायला सुंदर आहेस,...

१५ वर्षीय मुलीवर डान्स टीचरने केला लैंगिक अत्याचार, तू दिसायला सुंदर आहेस, चित्रपटामध्ये काम मिळवून देण्याचे आमिष  

Pune Crime: चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (sexually abused ) केल्याची घटना समोर असून आरोपीला अटक.

A 15-year-old girl was sexually abused by a dance teacher

पुणे: चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तू दिसायला सुंदर आहेस. तुला चित्रपटामध्ये काम मिळवून देतो असे सांगून पुण्यातील हडपसर भागात राहणार्‍या १५ वर्षीय मुलीवर डान्स टीचरने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सुशील राजेंद्र कदम वय ३२, रा. सर्व्हे नंबर १०३ गोपालपट्टी चौक मांजरी बुद्रुक असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  मागील सहा महिन्यापासून आरोपी सुशील कदम यांच्याकडे पीडित मुलगी डान्स शिकण्यास जात होती. तू दिसायला सुंदर असून तुला चित्रपटामध्ये काम मिळवून देतो असे आरोपी सुशील कदम याने पीडित मुलीस सांगितले. ही बाब पीडित मुलीने घरी सांगितली. त्यावर आरोपी सुशील याने आजवर अनेक वेळा फर्स्ट लुक करिता घेऊन गेला. त्या प्रत्येक वेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत तू जर कोणाला काही सांगितले. तर तुझ्या आई वडिलांना जीवे ठार मारेल अशी धमकी दिली होती. त्यामुळे पीडित मुलीने हा प्रकार घरी सांगितला नाही.

काल देखील फर्स्ट लुक करीता पीडित मुलीला आरोपी सुशील कदम घेऊन गेला. पण पीडित मुलीच्या आईला संशय आल्याने आरोपी सुशील कदम यास फोन केला. तुम्ही कुठे आहात आता भेटायचे आहे. त्यावर आरोपी सुशील कदम याने उडवाउडवीची उत्तर दिली. आम्ही सासवड येथील लॉजवर असल्याचे सांगितले. त्यानंतर पीडित मुलीचे घरचे सर्वजण घटनास्थळी गेले. त्यावेळी पीडित मुलीने तिच्यावर होणार्‍या अत्याचारा बाबत सांगितले. या घटनेनंतर आरोपी सुशील कदम विरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील  तपास सुरु आहे.

Web Title: A 15-year-old girl was sexually abused by a dance teacher

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here