Home क्राईम अल्पवयीन मुलीला टेरेसवर नेऊन तिच्यावर बलात्कार

अल्पवयीन मुलीला टेरेसवर नेऊन तिच्यावर बलात्कार

minor girl was taken to the terrace and raped

नवीन पनवेल: पनवेल येथील एका ११ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याने खळबळ उडाली आहे. ११ वर्षीय अल्पवयीन मुलगी किराणा दुकानातून घरी येत असताना एका १४ वर्षीय मुलाने तिला इमारतीच्या टेरेसवर तिला धमकी देत तिच्यावर बलत्कार करण्यात आला. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत मुलगी ही किराणा दुकानात गेली होती. घरी परतत असताना विधी संघर्षग्रस्त मुलाने तिला रस्त्यात गाठत तिच्या तोंडावर हात ठेऊन कच्ची मोहल्ला येथील इमारतीच्या टेरेसवर घेऊन गेला आणि तिला धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेबाबत मुलीने आपल्या घरातील व्यक्तींना माहिती दिली. यांनतर नातेवाईकांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक आर.एस. जाधव हे करीत आहे. अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिक व पोलिसांकडून चिंता व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: The minor girl was taken to the terrace and raped

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here