Home Accident News उस तोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रक प्रवरा नदीत कोसळला

उस तोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रक प्रवरा नदीत कोसळला

Shrirampur truck carrying the workers crashed into the Pravara river

बेलापूर | Shrirampur: उस तोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रक प्रवरा नदी पात्रात कोसळला. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील जुन्या पुलावरून ट्रक कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. यामध्ये चार महिला व पाच पुरुष जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कामगार वाहतूक करणारा ट्रक अकोले येथील अगस्ती कारखाना येथून कामगार घेऊन राहुरी कारखाना येथे जात असताना पहाटेच्या सुमारास समोरून येत असलेल्या इंडिका चार चाकी वाहनाने हुलकावणी दिल्याने ट्रक कठडे तोडून नदीपात्रात कोसळला. या ट्रक मध्ये १० ते १२ महिला तसेच उसतोड कामगार होते. त्यांना साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हा ट्रक दहाव्या ओठ्याशेजारीच कोसळल्यामुळे उस कामगार थोडक्यात बचावले. या अपघातातील चालक व किनरला जखमी झाले आहेत. श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Shrirampur truck carrying the workers crashed into the Pravara river

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here