Home पुणे राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार, मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार, मुसळधार पावसाची शक्यता

Monsoon Rain Alert: ५ ते ११ ऑगस्ट या कालावधीत राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता.

Monsoon will be active again in the state, heavy rain is likely

पुणे: याज्यात येत्या दोन दिवसांत मान्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. ५ ते ११ ऑगस्ट या कालावधीत राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सूनचे आगमन होणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईतही ७ आणि ८ ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पुन्हा मान्सुनचं पुनरागमन होणार आहे. बंगालच्या उपसागरात येत्या ४८ तासात नवं कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्याने विदर्भ मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता होणार आहे. भारतीय हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Monsoon will be active again in the state, heavy rain is likely

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here