Home Ahmednagar Live News Murder: मुलाने केला आईच्या प्रियकराचा गळा दाबून खून

Murder: मुलाने केला आईच्या प्रियकराचा गळा दाबून खून

Murder boy strangled his mother's lover to death

राहुरी | Murder: राहुरी तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. आईचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याने मुलाने प्रियकराचा गळा दाबून खून केला मात्र खून केल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव करीत अंत्यविधी उरकून घेण्याची घाई आरोपीकडून करण्यात आली. मयताच्या मुलीला शंका आल्याने मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला. त्याननंतर गळा दाबून खून केला असल्याचे अहवालात समोर आले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपीस अटक केली आहे.

राहुरी तालूक्यातील एका गावात आरोपीच्या आईचे मयत चांगदेव शंकर टिळेकर यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. ही गोष्ट आरोपीच्या मनात कायमच खटकत असल्याने शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आरोपीने टिळेकर यांचा गळा दाबून खून केला. टिळेकर यांचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे फोन करून नातेवाकांना कळविले. आरोपी अंत्यविधीची घाई करत होता. यावेळी आरोपीची मुलगी रुपाली बनकर यांना संशय आल्याने लोणी येथे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. अहवालात टिळेकर यांचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे समोर आले. याप्रकरणी रुपाली अजय बनकर रा. पुणे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Murder boy strangled his mother’s lover to death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here