Home कोल्हापूर अनैतिक संबंधातून हत्या! सिनेस्टाईल गोळी घालून प्रियकराला संपवलं

अनैतिक संबंधातून हत्या! सिनेस्टाईल गोळी घालून प्रियकराला संपवलं

Kolhapur Crime:  अनैतिक संबंधातून तरुणावर गोळी झाडून (Firing) हत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये समोर आली आहे. बाईकवरून आलेल्या तरुणाने गावठी कट्ट्यातून गोळी झाडून हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Murder from immoral relationship Cinestyle Firing shot the boyfriend

कोल्हापूर: अनैतिक संबंधातून तरुणावर गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये समोर आली आहे. कागल तालुक्यातील बाळेघोल येथील तरुणाची बाईकवरून आलेल्या तरुणाने गावठी कट्ट्यातून गोळी झाडून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कागल तालुक्यातील बाळेघोल इथल्या तरुणाची गावठी कट्ट्यातून गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. भरत बळीराम चव्हाण असे 32 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे.

आज सकाळी भरत आपल्या मित्रासोबत जात कापशीला कामासाठी होता. त्यावेळी समोरुन आलेल्या विकास मोहिते याने चिंगरे पाणंदमध्ये भरतच्या डाव्या कानाजवळ गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे या घटनेनंतर भरतवर गोळी झाडणारा संशयीत आरोपी विकास हेमंत मोहिते हा स्वतःहून मुरगूड पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने पोलिसांसमोर या हत्येची कबुली दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Murder from immoral relationship Cinestyle Firing shot the boyfriend

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here