Home Accident News समृद्धी महामार्गावर कारच्या अपघातात महिला जागीच ठार

समृद्धी महामार्गावर कारच्या अपघातात महिला जागीच ठार

Accident News: वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्गालगत असलेल्या लोखंडी कठड्यावर जाऊन आदळली. या अपघातात महिला जागीच ठार झाल्याची घटना.

Woman killed  in car accident on Samruddi Highway

वाशीम: गुजरात येथील गोयल दाम्पत्य समृद्धी महामार्गाने नागपूरकडे कारने जात असताना सोमवारी सकाळी वनोजानजीक कारचा (क्र. जीजे २७-के ८२७१) अपघात झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्गालगत असलेल्या लोखंडी कठड्यावर जाऊन आदळली. या अपघातात कारमधील सीमा गोयल या जागीच ठार झाल्या, तर सुरेंद्र गोयल हे जखमी झाले.

अपघाताबाबत समजताच सामाजिक कार्यकर्ते गोपाल राऊत, स्वप्नील चौधरी यांनी तत्काळ मदत केली. कारचा दरवाजा तोडून व काचा फोडून अपघातग्रस्तांना बाहेर काढले. तसेच टोल नाक्यावरील अॅम्ब्युलन्स व १०८ अॅम्ब्युलन्सला त्वरित माहिती देऊनही बराच वेळ वाट पाहावी लागली. वेळीच मदत मिळाली नसल्याने अपघातग्रस्त दगावण्याची चर्चा होती.

Web Title: Woman killed  in car accident on Samruddi Highway

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here