Home क्राईम धक्कादायक: प्रेयसीची हत्या करुन, प्रियकराची रेल्वेखाली आत्महत्या

धक्कादायक: प्रेयसीची हत्या करुन, प्रियकराची रेल्वेखाली आत्महत्या

Murder killing his girlfriend, his boyfriend commits suicide under the train

वसई: वसईच्या कळंब येथील एका लॉजमध्ये अल्पवयीन तरुणीची प्रियकराने गळा आवळून हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. ही हत्या केल्यानंतर प्रियकराने बोरीवली येथे रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या (Suicide) केली आहे. लॉज मध्ये नेऊन प्रेयसीची हत्या करण्याची मागील सव्वा महिन्यातील ही दुसरी घटना समोर आली आहे.

नालासोपारा पश्चिमेच्या कळंब येथील हर्षद फार्म हाऊस या लॉजमध्ये अभिषेक शहा (21) हा तरुण त्याच्या 17 वर्षीय अल्पवयीन प्रेयसीसह बुधवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास आला होता. काही वेळाने तो जेवण आणण्यासाठी बाहेर गेला,  मात्र परत आलाच नाही. लॉजच्या मालकाने खोलीत जाऊन पाहिले असता त्याची प्रेयसी मृतावस्थेत पडलेली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. आरोपी अभिषेकने गळा आवळून तिची हत्या केल्याचे अर्नाळा सागरी पोलिसांनी सांगितलं.  हत्येनंतर फरार झालेल्या प्रियकराने संध्याकाळी बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ धावत्या ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या (Suicide) केली.

सदर प्रियकर प्रेयसी नालासोपारा पूर्वेच्या शिर्डी नगर येथे राहत होते. आरोपी प्रियकर अभिषेक त्याच्या प्रेयसीला अश्लील फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करत होता. मंगळवारी प्रेयसीने घरातून 15 हजार रुपये घेतले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Murder killing his girlfriend, his boyfriend commits suicide under the train

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here