Home क्राईम मैत्रीण फक्त त्याच्याशीच बोलते म्हणून तरुणाला दगडाने ठेचून मृतदेह नदीत फेकला

मैत्रीण फक्त त्याच्याशीच बोलते म्हणून तरुणाला दगडाने ठेचून मृतदेह नदीत फेकला

Murder Case girlfriend only talks to him, so the young man is stoned to death 

पुणे | Pune Crime:  आमची मैत्री तुझ्याशी बोलते आमच्याशी बोलत नाही म्हणून एका तरुणाचे अपहरण (Kidnap) करून त्याला दगडाने ठेचून खून (Murder) करून त्याचा मृतदेह शेल पिंपळगाव येथील नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  कृष्णा रेळेकर असे खून झालेल्या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे. ७ ते ८  आरोपी आणि दोन सज्ञान आरोपींनी मिळून कृष्णाची निर्घृण हत्या केल्याने मोशी परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अविनाश पिसे याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यासोबतच इतर आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. मोशीतील शिवाजी वाडी येथून आरोपींनी मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास कृष्णाचं अपहरण केलं होत. कृष्णाच्या अपहरणाची माहिती मिळताच त्याच्या आईने भोसरी पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली होती.

भोसरी पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेतला असता. सात – आठ अल्पवयीन आणि दोन संज्ञान आरोपींनी कृष्णाची निर्घृण हत्या केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. यामधील सर्व आरोपींची एक कॉमन मैत्रीण असून ती सर्वांशी न बोलता फक्त कृष्णासोबतच बोलत होती. याचाच राग मनात धरून आरोपींनी कृष्णाचा खून केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणाचा अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Web Title: Murder Case girlfriend only talks to him, so the young man is stoned to death 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here