Home महाराष्ट्र बॉलिवूडला मोठा धक्का! या ज्येष्ठ अभिनेत्रीच निधन

बॉलिवूडला मोठा धक्का! या ज्येष्ठ अभिनेत्रीच निधन

Veteran actress Manju Singh Passes Away

मुंबई | actress Manju Singh Passes Away: ‘गोलमाल’ फेम मंजू सिंग या ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन झाल्यानं बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी हृद्यविकाऱ्याच्या झटक्यामुळं त्यांचं निधन झाल्याची  माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. टेलिव्हीजन शो निर्मात्या आणि अभिनेत्री म्हणून त्यांनी सिनेविश्वात ठसा होता. त्यांच्या निधनाने कलाविश्वात शोक व्यक्त होत आहे.

गीतकार, दिग्दर्शक स्वानंद किरकिरे यांनी ट्विटरवर त्यांचा एक फोटो शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलंय,  मंजू सिंग राहिल्या नाहीत. दुरदर्शनसाठी ‘स्वराज’ शो लिहायचा होता. त्यावेळी मंजू सिंग यांनी दिल्लीहून मला मुंबईत आणलं. त्यांनी दूरदर्शनसाठी एक कहानी, शो टाईम इत्यादी शो केले. हृषीकेश मुखर्जींच्या गोलमालमधील रत्ना.. आमची लाडकी मंजू.. तुमचं प्रेम आम्ही कसं विसरु शकतो.. अलविदा! अशाप्रकारे शोक व्यगोलमाल सिनेमात अमोल पालेकर आणि उत्पल दत्त यांचे कॉमिक सीन्सची आजही आठवण होते. या सिनेमात मंजू यांनी अमोल यांच्या छोट्या बहिणीची भूमिका साकारली होती. त्यांनी या सिनेमात अप्रतिम अभिनय केला आहे.

मंजू सिंग यांनी ‘स्वराज’, ‘एक कहानी’, शो टाइम यांच्यासह अनेक अप्रतिम कार्यक्रम प्रोड्युस केले आहेत. तसंच त्यांनी लहान मुलांचा शो ‘खेल खिलौने’ मध्ये सूत्रसंचालनही केलं होतं. टीव्ही निर्मात्या म्हणून सिंग यांनी १९८३ मध्ये सुरुवात केली होती. २०१५ ला शिक्षण आणि क्रिएटीव्ह आर्ट्समध्ये त्यांनी भरीव योगदान दिल्यानं भारत सरकारकडून त्यांना सेंट्रल एडव्हायजरी बोर्ड ऑफ एज्युकेशनमध्ये सदस्य म्हणून नियुक्त केलं होतं.

Web Title: Veteran actress Manju Singh Passes Away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here