Home महाराष्ट्र Suicide: बारावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide: बारावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Twelfth grader commits suicide by strangulation

सोलापूर :  शेतातील मोटार चालू करण्यास जातो असे सांगून गेलेल्या एका तरुणाने शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या  (Suicide) केल्याची धक्कादायक घटना जामगाव येथे घडली आहे. सूरज केशव आवटे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

तो बार्शी तालुकातील जामगावचा रहिवासी होता. सुरज हा इयत्ता १२ वीत शिकत होता. त्याने नुकतीच १२ वी ची परीक्षा दिली होती. तो १४ एप्रिल रोजी घरातून रात्री नऊच्या सुमारास शेतातील मोटार चालू करण्यास जातो असे सांगून गेला होता.

परंतु रात्री घरी परतलाच नाही. शेतात जाऊन पाहिले असता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे   आढळून आले आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह पोलिसांनी खाली उतरविला.  पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह बार्शी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनेसाठी पाठवण्यात आले आहे. याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Twelfth grader commits suicide by strangulation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here