Home क्राईम तीन दिवसांपूर्वी भाडेकरू म्हणून आले, सकाळी पतीला डब्बा करून दिला; त्यानंतर महिलेसोबत...

तीन दिवसांपूर्वी भाडेकरू म्हणून आले, सकाळी पतीला डब्बा करून दिला; त्यानंतर महिलेसोबत भयंकर घडलं

Nashik Crime:  परप्रांतीय महिलेची गळा चिरून हत्या (Murder) केल्याची घटना.

Murder of a migrant woman by slitting her throat

नाशिक:  सातपूर भागात परप्रांतीय महिलेची गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही महिला तीन दिवसांपूर्वीच सातपूरच्या विधाते भागात भाडेकरू म्हणून वास्तव्यास आली होती. अचानक झालेल्या घटनेने परिसर हादरला असून या प्रकरणी सातपूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर भागात धक्कादायक घटना समोर आली असून गल्लीत तीन दिवसांपासून भाडेकरू म्हणून राहणाऱ्या महिलेची अज्ञात व्यक्तीने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणात असून मृत महिलेच्या मारेकऱ्यांचा शोध घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून काही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मध्यप्रदेशातील रहिवासी असलेले शनिदयाल बैस हे पत्नी अशोक्तीबाई यांच्यासोबत तीन दिवसांपूर्वीच सातपूरच्या विधाते गल्लीत भाडेकरू म्हणून राहायला आले आहेत. सोमवारी पहाटे अशोक्तीबाई हिने पती शनिदयाल यास कामावर जाण्यासाठी डबा तयार करून दिला. त्यानंतर पती शनिदयाल बैस कामावर गेल्यानंतर काही वेळातच त्यांच्या दहा वर्षांच्या मुलीला तिची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने घर मालकास सांगितले. घरमालकाने ही घटना तात्काळ शनिदयाल यांना कळवली. शनिदयालने पुन्हा घराकडे धाव घेत पोलिसांना या घटनेची माहिती दिली. सातपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत पंचनामा केला.

दरम्यान, या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सातपूरमध्ये महिलेची गळा चिरून हत्या झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी घटनास्थळी दाखल होत पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले.

Web Title: Murder of a migrant woman by slitting her throat

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here