Home महाराष्ट्र ब्रेकिंग: रोहिणी खडसे पोलिसांच्या ताब्यात

ब्रेकिंग: रोहिणी खडसे पोलिसांच्या ताब्यात

Rohini Khadase:   काळया झेंडयांच्या धास्तीने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी रोहिणी खडसे व अन्य पदाधिकाऱ्यांना ताब्यात.

Rohini Khadse in police custody

कापूस दराच्या प्रश्नावरून जळगाव दौयावर असलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या ताफ्याला काळे झेंडे. दाखविण्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिला होता. काळया झेंडयांच्या धास्तीने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी रोहिणी खडसे व अन्य पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही यावेळी धरपकड करण्यात आली.

रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. सरकारची पोलिसाच्या मदतीने दडपशाही सुरू आहे. त्यांनी काळे झेंडे दाखवले नाहीत किंवा ते रस्त्यावरही उत्तरले नाहीत. ते सर्व राष्ट्रवादीच्या कार्यालयात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. महिलांना उचलून घेऊन गेले. ही हुकूमशाही आहे की लोकशाही, असा सवाल खडसे यांनी केला. स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात शिवसैनिकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली.

Web Title: Rohini Khadse in police custody

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here