Murder: लोखंडी फावडे डोक्यात मारून तरूणाचा खून
Breaking News | Murder Crime: एका ३२ वर्षीय तरूणाचा तोंडावर आणि डोक्यावर लोखंडी फावड्याने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात एका ३२ वर्षीय तरूणाचा तोंडावर आणि डोक्यावर लोखंडी फावड्याने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक समोर स आली आहे. कृष्णा एकनाथ डोळस असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरातील लक्ष्मीनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या कृष्णा डोळस याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन घरी येत असल्याने त्याचे आणि कुटुंबातील सदस्यांचे सतत भांडण व्हायचे. त्यामुळे लक्ष्मीनगर येथे तो एकटाच राहत होता. त्याला त्याचे वडील जेवणाचा डबा रोज पोहचवून देत होते. दरम्यान मंगळवारी दुपारी चार वाजता वडिलांनी त्याला डबा दिला. यानंतर ते निघून गेले होते. वडील जेवणाचा डबा घेऊन गेल्यानंतर अज्ञाताने कृष्णा डोळस याच्या तोंडावर व डोक्यावर लोखंडी फावड्याने प्रहार करून त्याचा खून केला. हि घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.
Web Title: Murder of a youth by beating him with an iron shovel
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study