पत्नीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या चुलत मेहुण्याचा खून; चौघे अटकेत
Pune Crime: चुलत मेहुण्याचा खून (Murder), भारती विद्यापीठ पोलिसांनी ४८ तासांत अटक केल्याची माहिती.
पुणे: पत्नीला अश्लील मेसेज पाठवून त्रास देणाऱ्या चुलत मेहुण्याचा खून करणाऱ्या आरोपीसह चौघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी ४८ तासांत अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तुषार मेटकरी (३३), विनोद दुपारगुडे, किरण चौधरी, आशा मेटकरी अशी अटक केलेल्यांची नावे असून महादेव दुपारगुडे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जांभुळवाडी परिसरात १९ ऑगस्टला तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर भारती विद्यापीठ ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे व सहकाऱ्यांनी तुषारला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चुलत मेहुणा महादेव हा पत्नी आशाला अश्लील मेसेज करत होता. त्यामुळे १९ ऑगस्टला त्याला फोन करून धायरी परिसरात बोलावून घेत तेथे दोन चुलत मेहुण्यांसह पत्नीच्या साथीने त्याला मारहाण करून ठार केले. त्यानंतर रिक्षातून जांभूळवाडी परिसरात टाकून दिले.
Web Title: Murder of cousin brother-in-law who sent obscene messages to his wife