Home महाराष्ट्र भारतीय संघाला मोठा धक्का: मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला कोरोनाची लागण

भारतीय संघाला मोठा धक्का: मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला कोरोनाची लागण

Rahul Dravid Corona Positive: आशिया चषकाला राहुल द्रविड मुकण्याची शक्यता.

Rahul Dravid Corona Positive

मुंबई: आशिया चषकाला सुरुवात होणार आहे.  तोंडावर स्पर्धा आलेली असताना संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला कोरोनाची लागण झाली आहे.  त्यामुळे  येत्या 27 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया चषकाला राहुल द्रविड मुकण्याची शक्यता आहे.

तर कोरोनामुळे  मुख्य प्रशिक्षक चषकासाठी जाऊ शकला नाही तर हा भारतीय संघासाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.अगोदरच जसप्रीत बूमराह आणि हर्शल पटेल दुखापतीमुळे बाहेर आहेत.  शिवाय राहिल द्रविडला कोरोना लागण झाल्यामुळे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी व्हीव्हीएस लक्ष्मणकडं सोपवली जाण्याची शक्यता आहे.  या स्पर्धेत भारतीय संघ पहिला सामना पाकिस्तानसोबत खेळला जाणार आहे.

मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मुख्य प्रशिक्षक असलेल्या द्रविडला कोरोना लागण झाल्याने टीम इंडियासाठी हा मोठा झटका बसला आहे.

Web Title: Rahul Dravid Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here