Home पुणे पुणे हादरले ! दापोडीत पती-पत्नीची हत्या, रक्ताने माखलेली टिकाव हाती घेत…..

पुणे हादरले ! दापोडीत पती-पत्नीची हत्या, रक्ताने माखलेली टिकाव हाती घेत…..

Pune Murder case : पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  एका पती पत्नीचा खून करत हाती टिकाव घेऊन आरोपी हा रस्त्यावर फिरत होता. दापोडी दुहेरी हत्याकांडाने हादरले.

Murder of husband and wife in Dapodi

पुणे : पुण्यातील दापोडी दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. एका वृद्ध दाम्पत्याची पावड्याने शनिवारी मध्यरात्री घडली आहे. हत्तेनंतर आरोपी रक्ताने माखलेला फावडा हातात घेऊन रस्त्याने फिरत होता. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. ही हत्या (Murder) का करण्यात आली, याचे कारण अद्याप समोर आले नाही.

शंकर नारायण काटे (वय ६०) आणि संगीता काटे (वय ५५) अशी हत्या झालेल्या पती- पत्नीची नावे आहेत. प्रमोद मगरुडकर (वय ४७) असे आरोपीचे नाव आहे. शनिवारी रात्री १० च्या सुमारास काटे दाम्पत्य हे त्यांच्या घरात बसले होते. यावेळी आरोपी प्रमोदने ते बेसावध असतांना त्यांच्या डोक्यावर फावड्याने वार केले. यात दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. त्यांची हत्या केल्यावर प्रमोद हा रक्ताने माखलेला फावडा घेऊन रस्त्याने फिरत होता. यामुळे नागरिक देखील भयभीत झाले. काही नागरिकांनी त्याचा व्हिडिओ काढला.

हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. आरोपी प्रमोद हा व्हिडिओत बडबड करत असतांना दिसत होता. तो नुकताच दिल्लीवरून आला होता. २०१७ ला माझ्या आईचा मृत्यू झालेल्या व्यक्तीने बलात्कार केला आणि त्याच्या पत्नीने त्यास मदत केली, असे म्हणत होता. एवढेच नाही तर जगदंब जगदंब देखील तो म्हणत होता. नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने त्यांचा खून का केला याचा तपास भोसरी पोलिस करत आहेत.

Web Title: Murder of husband and wife in Dapodi

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here