Home बीड ९ महिन्यांची गर्भवती आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार

९ महिन्यांची गर्भवती आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार

बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, प्रसूतीआधीच महिला अंमलदारांच्या हातावर तुरी ठेवून तिने पहाटे धूम ठोकली.

9 months pregnant accused discharged from district hospital

बीड: लग्नाळू तरुणांची बनावट लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीची मास्टरमाईंड पूजा कचरू निलपत्रेवार (२७) प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. मात्र, प्रसूतीआधीच महिला अंमलदारांच्या हातावर तुरी ठेवून तिने पहाटे धूम ठोकली.

डिसेंबर २०२२ मध्ये बीडमध्ये अडीच लाख रुपये देऊन वसमत (जि. परभणी) येथे मुद्रांकावर लग्न लावून मोठ्या हौसेने आणलेली नवरी करवलीसह पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नवरदेवाने पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केली होती. केले.

यानंतर बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता. यात ११ आरोपींचा सहभाग आढळून आला होता. या प्रकरणी ८ जणांना अटक झाली तर दोन वयोवृद्ध आरोपींना नोटीसवर सोडण्यात आले. पूजा निलपत्रेवार ही नऊ महिन्यांची गर्भवती आहे. जामिनासाठी तिने उच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली, पण तिचा निभाव लागला नाही. १० फेब्रुवारीला प्रसूतीसाठी तिला कारागृहातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, पहाटे पाच वाजता लघुशंकेला जाण्याचा बहाणा करून तिने पलायन केले.

Web Title: 9 months pregnant accused discharged from district hospital

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here