Home क्राईम संगमनेर: भावास लोखंडी फावड्याने मारहाण

संगमनेर: भावास लोखंडी फावड्याने मारहाण

sangamner Crime: सामाईक बोअरवेलमधील पाणी वाटपाच्या वादातून भावास लोखंडी फावड्याने मारहाण केल्याची घटना.

Sangamner Crime Brother was beaten with an iron shovel

संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे सामाईक बोअरवेलमधील पाणी वाटपाच्या वादातून भावास लोखंडी फावड्याने मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि.९ फेब्रुवारी) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी शिवाजी भिकाजी आव्हाड (वय ५१, रा. दरेवाडी, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुभाष भिकाजी आव्हाड याच्याविरुद्ध घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी, दरेवाडी येथील शेतकरी शिवाजी आव्हाड यांची पत्नी त्यांच्या घरासमोरील टाकीत सामाईक बोअरवेलमधील पाणी भरत असताना त्याचवेळी शिवाजी यांचा भाऊ सुभाष तेथे आला आणि म्हणाला, ‘तुम्ही बोअरवेलचे पाणी भरायचे नाही, आज आमचा नंबर आहे. त्यावेळी शिवाजी हे समजून सांगत असताना सुभाष यास राग आल्याने त्याने शिवाजी यांना शिवीगाळ करून तेथे पडलेल्या लोखंडी फावड्याने डोक्यात मारले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, शिवाजी यांची पत्नी सोडविण्यास आली असता त्यांनाही शिवीगाळ करून हात पिरंगाळत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Sangamner Crime Brother was beaten with an iron shovel

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here