Home क्राईम कोयत्या गँगचा हैदोस; पोलिसाच्या मुलाची हत्या, परिसरात खळबळ

कोयत्या गँगचा हैदोस; पोलिसाच्या मुलाची हत्या, परिसरात खळबळ

Pune Crime: कोयत्या गँगची दहशत सुरूच, पुण्यात सिंहगड रस्त्यावर पोलिसाच्या मुलाची हत्या (Murder).

Murder of policeman's son, excitement in the area

पुणे: पुण्यात कोयत्या गँगची दहशत सुरूच आहे. पुण्यात सिंहगड रस्त्यावर पोलिसाच्या मुलाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. चार ते पाच हल्लेखोरांनी कोयत्याने वार करत पोलिसाच्या मुलाची हत्या केली आहे. शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात सिंहगडमध्ये लाईन बॉय विजय ढुमे यांचा धारदार हत्यार आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ ही घटना घडली. सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही हत्येची धक्कादायक घटना घडली आहे.

पुण्याच्या सिंहगड येथील एका लॉजमधून विजय ढुमे खाली उतरत होते. या लॉजमधून खाली उतरल्यानंतर बाहेर पडत असताना चार ते पाच हल्लेखोरांनी विजय ढुमे यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. हल्ल्यानंतर विजय ढुमे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले.

सिंहगड रोड पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. या हत्या प्रकरणातील आरोपींचा तपास सुरू आहे. या हत्ये प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे सध्या पुणे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. विजय ढुमे हे सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा असून त्याचे अनेक बड्या पोलिस अधिकार्‍यांशी मैत्रीचे संबंध होते आणि अनेक राजकारणी व्यक्तींशी त्यांचे चांगले संबंध होते.

Web Title: Murder of policeman’s son, excitement in the area

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here