Home पुणे चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराकडूनच प्रेयसीचा खून

चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराकडूनच प्रेयसीचा खून

Breaking News | Pune Crime: इंद्रायणी नदीच्या पुलाजवळील मोकळ्या जागेत एका महिलेच्या डोक्यावर दगडाने वार करून खून केल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आली आहे.

Murder of the beloved by the lover due to suspicion of character

पिंपरी चिंचवड : इंद्रायणी नदीच्या पुलाजवळील मोकळ्या जागेत एका महिलेच्या डोक्यावर दगडाने वार करून खून केला होता. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या घटनेची उकल केली असून प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरून हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड परिसरातील या घटनेतील मयत महिला आणि आरोपीचा ज्ञानेश्वर गजानन इंगोले यांची काही दिवसांपूर्वी तोंड ओळख झाली होती. या ओळखीतून ज्ञानेश्वर इंगोले याचे मयत महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले होते. दरम्यान सदर महिलेने ज्ञानेश्वरला लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सदर महिला इतर काही पुरुष आणि मुलांसोबत बोलू लागल्याने ज्ञानेश्वर इंगोलेला तिच्या चारित्र्यावर संशय हेऊ लागला. त्या रागातूनच त्याने महिलेचा दगडाने ठेचून खून केला होता.

सदर महिलेच्या खुनाचा छडा लावण्यात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांना यश आला आहे. चारित्राच्या संशयावरनं महिलेच्या प्रियकराने तिचा दगडाने ठेचून खून केल्यास पोलीस तपासात निष्पन्न झाल आहे. या प्रकरणात सदर महिलेचा प्रियकर ज्ञानेश्वर गजानन इंगोले याला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा तीन पोलीस पथकाने अटक केली असून त्याच्या विरोधात दिघी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Murder of the beloved by the lover due to suspicion of character

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here